हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला लळितोत्सव

३३४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला व डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुपम सोहळा
Lalitotsav
हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला लळितोत्सवfile photo
Published on: 
Updated on: 

Lalitotsav took place in the presence of thousands of devotees

देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवाः प्रतितिरूपती व जागृत देवस्थान असलेल्या व ३३४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या, श्री बालाजी महाराजांचा लळितोत्सव हजारो भाविकांच्या साक्षीने आश्विन कृ. ४, गुरुवार, दि. २९ रोजी सूर्योदयी ५:४५ वाजता पार पडला.

Lalitotsav
Actress Madhu Kambikar|'राघू' पाठोपाठ 'मैना'ही आज उडून गेली! अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन, पडद्यावरच्या 'लव्ह बर्ड'ची अशीही गोष्ट

श्री बालाजी महाराजांच्या मंदिरासमोर विजयादशमीच्या पूर्वसंध्येला २१ महाकाय लाकडी लाटा व ४२ मंडप दोराच्या सहाय्याने उभारून मंडपोत्सव साजरा करण्यात आला होता. सकाळी काकड आरती झाली. मंदिरावर दहीहंडी बांधण्यात आली. यावेळी ब्रम्हवृंदांच्या वतीने शांतीपाठ करण्यात आला व काल्याचे कीर्तन झाले.

श्री बालाजी महाराजांची आरती सुरू झाल्यानंतर तसेच दहिहंडी फुटल्यानंतर एकाच वेळी सर्व २१ लाटा मंदिराच्या दिशेने कलंडल्या. श्रींच्या मूर्तीला विधीवत गाभाऱ्यात बसविण्यात आले. लळितोत्सवानंतर श्री बालाजी संस्थानच्या वतीने भक्तांसाठी लाडू प्रसाद वाटप करण्यात आला. लाडू प्रसाद बनवणे व वितरण करणे यासाठी मारवाडी समाजाने परिश्रम घेतले. परिसरातील स्वयंसेविका महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अन्नछत्र सेवा, मंदिर परिसराची स्वच्छता, भाविकांच्या दर्शन रांगा नियंत्रण तसेच लाडू प्रसाद वितरण, इत्यादी सेवा संपूर्ण आठवडा देऊन सेवावृत्तीचा आदर्श निर्माण केला.

Lalitotsav
Kamalja Temple : कमळजा मातेचे प्राचीन मंदिर जलमय; शेडमध्ये मातेची प्रतिमा

या उपक्रमाचे नियोजन राणीसाहेब छायाराजे विजयसिंह जाधव या दरवर्षी करत असतात. संस्थानचे विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापक किशोर बीडकर व संस्थानचे कर्मचारी, पोलिस प्रशासन, सर्व मानकरी आदींनी केले.

भाविकांना चहा, नाश्त्याची सोय

लळितोत्सवाचा आनंद घेण्यासाठी पूर्वसंध्येलाच शहरात दाखल झालेल्या भाविकांसाठी शहरातील विविध सामाजिक संघटना, मित्र मंडळांच्यावतीने चहा, नास्ता व इतर सेवांची व्यवस्था करण्यात आली. श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपारिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी सर्व स्टॉलला भेट दिली व श्री बालाजी संस्थानतर्फे सर्व मंडळांचा सत्कार करण्यात आला.