Gajanan Maharaj | शेगावच्या गजानन महाराज मंदिर परिसरात आता मोबाईल वापरता येणार नाही : संस्थानकडून सक्त निर्बंध

भाविकांना शांत वातावरणात सुलभ व सुरक्षित दर्शन घेता यावे यासाठी निर्णय
Gajanan Maharaj mandir
Gajanan Maharaj | शेगावच्या गजानन महाराज मंदिर परिसरात आता मोबाईल वापरता येणार नाही
Published on
Updated on

बुलढाणा : श्रीक्षेत्र शेगाव येथील गजानन महाराज मंदिराच्या परिसरातील पावित्र्य व शांतता अबाधित राहण्यासाठी तसेच भाविकांना शांत वातावरणात सुलभ व सुरक्षित दर्शन घेता यावे या हेतूने गजानन महाराज संस्थानने मंदिराच्या परिसरात मोबाईल वापरावर सक्त निर्बंध लागू केले आहेत.

शिस्त,शांतता व स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असलेल्या श्रींच्या मंदिरात दरदिवशी हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते.अशावेळी मोबाईलवरून बोलणे,फोटो व व्हिडिओ काढणे अशा प्रकारामुळे नेहमीच्या शांततामय व सुरळीत दर्शन व्यवस्थेवर परिणाम होत असून भाविकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारापासूनच आपला मोबाईल बंद ठेवावा लागणार आहे.

मंदिर परिसरात कुणी भाविक मोबाईलचा वापर करतांना आढळल्यास त्याचेकडील मोबाईल तात्काळ संस्थानच्या कार्यालयात जमा केला जाणार आहे.ताब्यात घेतलेला मोबाईल परत मिळवण्याच्या प्रक्रियेत भाविकांचा वेळ वाया जाण्याबरोबर मानसिक त्रासही होऊ शकतो हे टाळण्यासाठी तसेच मंदिराच्या परिसरातील शांतता, शिस्त आणि आध्यात्मिक वातावरण कायम राहण्यासाठी भाविकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे.असे आवाहन गजानन महाराज संस्थान शेगावच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news