बुलढाणा : समृध्दी महामार्गावर बसवर दगडफेक करणारे चौघे जेरबंद

बुलढाणा येथील पोलिसांची कारवाई
Buldhana News
समृध्दी महामार्गावर बसवर दगडफेक करणारे चौघे जेरबंद Pudhari Photo
Published on
Updated on

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : समृध्दी महामार्गावर रात्रीच्या वेळी धावत्या खासगी बसवर पुलावरून दगडफेक करणा-या चार जणांच्या टोळक्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या मार्गावरील एक हॉटेल व वाईन बारच्या मालकाने साथीदारांसह कट रचून बसवर दगडफेक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याबाबत अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांनी दिलेली माहिती अशी की, ७ आक्टोबरच्या रात्री समृध्दी महामार्गावर देऊळगाव कोळ गावाजवळील ओव्हरहेड ब्रीज वरून काही अज्ञात लोकांनी दिग्रस येथून मुंबईकडे चाललेल्या 'माही टैव्हल्स'च्या बस (क्र.एमएच 29 बीई 6777)वर जोरदार दगडफेक केली होती. यावेळी प्रसंगावधान राखून चालकाने बस वेगाने पुढे नेल्याने मोठा अनर्थ टळला होता.मात्र बसची समोरील काच फुटून चालक व दोन प्रवासी जखमी झाले होते. पुढे काही अंतरावर बस थांबवून चालकाने पोलीसांत तक्रार दिली होती. दगडफेकीच्या घटनेने खळबळ उडाली होती.

Buldhana News
तीन वेळा जीवघेणा हल्ला; बंडखोर काळूराम धोदडेंचा संघर्षमय प्रवास

पोलीसांच्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली.एक संशयित ट्रॅव्हल्स एजंट तेजराव सिरसाठ याला सुलतानपूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.त्यानेच मुख्य आरोपीला 'माही ट्रॅव्हल्स बसचे लोकेशन कळवले होते.तपासात समोर आलेली अधिक माहिती अशी की, रामनारायण चव्हाण रा.खापरखेड घुले याचे बिबी ते सुलतानपूर दरम्यान 'रामभरोसे हाटेल व 'रंगीला वाईनबार' आहे.या ठिकाणी माही ट्रॅव्हल्स दिग्रसच्या बसेस रात्रीच्या वेळी जेवनासाठी थांबायच्या.हाटेल मालक व ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकात वाद झाल्याने मागील वर्षीपासून तेथे बसेस थांबणे बंद झाले.परिणामी व्यवसायाला अवकळा आल्याने चव्हाण याने हाटेल व बार अन्य व्यक्तीला चालवायला दिला.बसचा थांबा बंद झाल्याचा राग मनात ठेवून रामनारायण चव्हाण याने बारचा चालक शुभम आटोळे,तेथील नोकर शेख जावेद शेख शरीफ व ट्रॅव्हल्स एजंट तेजराव सिरसाठ या तीघांच्या मदतीने कट रचला व समृध्दी महामार्गावरून संबंधित बस जातेवेळी पुलावरून दगडफेक केली. पुर्ववैमनस्यातून हा प्रकार केल्याचे उघड झाले. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news