'पतीव्रता आहे दाखवण्यासाठी महिला मोठे कुंकू, मोठे मंगळसूत्र घालतात...'; माजी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

Rahul Bondre controversial remark | चिखली शहरात संतप्त महिलांकडून तीव्र निषेध...
'पतीव्रता आहे दाखवण्यासाठी महिला मोठे कुंकू, मोठे मंगळसूत्र घालतात...'; माजी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
Published on
Updated on

बुलढाणा : जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष व काँग्रेसचे चिखलीचे माजी आमदार राहूल बोंद्रे यांनी महिलांविषयी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याने महिला वर्गात संताप व्यक्त होत आहे. चिखली शहरातील महिलांनी आज बोंद्रे यांच्या वकतव्याच्या निषेधार्थ आंदोलन केले व घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेवर कुंकू व मंगळसुत्र रेखाटले.

प्रकरण असे आहे की, बुलढाण्याचे शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी गुरुवारी सायंकाळी राहूल बोंद्रे यांच्या चिखली येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली व विविध चर्चांना ऊत आला. यावर आज शनिवारी बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राहूल बोंद्रे यांना,"आपण कांग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करणार आहात काय? असे विचारले असता. स्पष्टीकरण देताना बोंद्रे म्हणाले,"मी आधी एकदा सांगितलं परत परत सांगण्याची आवश्यकता मला तरी वाटत नाही. कुणी महिला असते तीला दाखवावे लागते की, "मी पतीव्रता आहे, ती मोठे कुंकू लावते, मोठे मंगळसूत्र घालते!" माजी आमदार राहूल बोंद्रे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे महिला वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

चिखली शहरात छत्रपती शिवाजी चौकात अनेक नगरसेविका, सामाजिक कार्यकर्त्या व महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत निषेध आंदोलन केले. यावेळी बोंद्रे यांच्या प्रतिमेवर कुंकू व मंगळसुत्र रेखाटण्यात आले. सकल महिला वर्गाची बोंद्रे यांनी माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी नगर परिषदेच्या महिला व बालविकास सभापती सुषमा चव्हाण म्हणाल्या, कुंकू व मंगळसुत्र ह्या पवित्र प्रतिकांवर तथा महिलांच्या अस्मिता चिन्हांवर विपर्यस्त वक्तव्य करून बोंद्रे यांनी सकल महिला वर्गाचा अपमान केला आहे.तो सहन केला जाणार नाही.त्यांनी तात्काळ माफी मागावी. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल. महिलांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माजी आमदार राहूल बोंद्रे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news