खानाच्या मार्गावरून चाललेल्या आघाडीला पराभूत करा : अमित शहा

Maharashtra assembly poll | महाविकास आघाडीची गॅरंटी ही भ्रष्टाचार,जातीयवाद, तुष्टीकरण व खोटारडेपणाची गॅरंटी
Amit Shah on defeating opposition
खानाच्या मार्गावरून चाललेल्या आघाडीला पराभूत करा : अमित शहाpudhari photo
Published on: 
Updated on: 

बुलढाणा: आज शिवप्रताप दिन. याच दिवशी शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध करून विजापूरला धक्का दिला होता. आमची लढाई ही शिवाजी राजांचा मार्ग व अफजलखानाचा मार्ग यांच्यामधील आहे. अफजलखानाच्या मार्गावरुन चाललेल्या महाविकास आघाडीला पराभूत करा असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मलकापूर येथील प्रचार सभेत केले.

शहा पुढे म्हणाले,महाविकास आघाडीची गॅरंटी ही भ्रष्टाचार,जातीयवाद, तुष्टीकरण व खोटारडेपणाची गॅरंटी आहे.त्यांनी कर्नाटक,हिमाचल प्रदेश,तेलंगणा राज्यात दिलेली गॅरंटी पुर्ण करू शकले नाहीत. मनमोहनसिंह सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था जगात११व्या स्थानावर होती. मोदी सरकारने ती ५व्या स्थानी आणली आहे. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास महिला,युवक,शेतकरी व दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. (Maharashtra assembly poll)

मंचावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव , रक्षाताई खडसे आणि जिल्ह्यातील भाजपाचे चार उमेदवार चैनसुख संचेती (मलकापूर), डॉ.संजय कुटे(जळगाव जामोद),आकाश फुंडकर(खामगाव)व श्वेता ताई महाले (चिखली)आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news