Buldhana News : काँग्रेसच्या २ आमदारांसह ९२ जणांवर गुन्हे दाखल

संजय गायकवाड यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक
Sanjay Gaikwad, Buldhana news
गायकवाडांवर कारवाईची मागणी करणा-या काँग्रेसच्या २ आमदारांसह ९२ जणांवर गुन्हा दाखल pudhari photo
Published on
Updated on

बुलढाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटून आणण्यासाठी ११ लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा करणारे शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली होती. यानंतर काँग्रेसच्या ९२ नेते आणि कार्यकर्त्यांवर बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. (Buldhana News)

काल सोमवारी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते पोलीस ठाण्यात गेले होते. आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून करण्याची त्यांची मागणी होती. मात्र, पोलीस प्रशासन तक्रारीची दखल घेत नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाणेदाराच्या कक्षात ठिय्या मांडला होता. पाच तासानंतर पोलीसांनी आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल केल्यावर काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते पोलिस ठाण्यातून परतले होते. मात्र आज शहर पोलिसांनी पलटवार केला.

काँग्रेसचे २ आमदार, २ माजी आमदारांसह ९२ कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी आमदार राजेश एकडे, आमदार धिरज लिंगाडे, माजी आमदार राहूल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ आदींसह ९२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Sanjay Gaikwad, Buldhana news
‘मोदींची हत्या करायला तयार रहा’, वादग्रस्त विधान करणा-या काँग्रेस नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news