

बुलडाणा : विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यातील सातही मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी ७२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ११५ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
मलकापूर मतदारसंघात ७, बुलढाणा येथे ८, चिखली येथे १८, सिंदखेड राजा येथे १८, मेहकर येथे ११, खामगांव येथे ४ व जळगांव जामोद येथे ६ असे एकूण ७२ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज मागे घेतले.
मलकापूर येथे १५, बुलढाणा येथे १३, चिखली येथे २४, सिंदखेड राजा येथे १७, मेहकर येथे १९, खामगांव येथे १८ व जळगांव जामोद येथे ९ असे एकूण ११५उमेदवारांमध्ये लढत होईल.
मलकापूर मतदारसंघ - संदिप देविदास फाटे, मोहम्मद दानीश अब्दुल रशीद,विरसिंह ईश्वरसिंह राजपुत,सुनिल वसंतराव विंचनकर,सचिन दिलीप देशमुख,सौरभ चंद्रवदन इंगळे, हरीश महादेवसिंह रावळ ( सर्व अपक्ष).(Maharashtra assembly poll)
बुलढाणा मतदारसंघ - प्रमोद पुंजाजी कळसकर,स्वाती विष्णू कंकाळ, प्रा. सदानंद मन्साराम माळी, जितेंद्र एन.जैन, प्रा. रतन आत्माराम कदम,विजयराज हरिभाऊ शिंदे,डॉ. मोबीन खान अय्युब खान,आरिफ खान विवन खान ( सर्व अपक्ष).
चिखली मतदारसंघ - नरहरी ओंकार गवई,नाजेमा नाज इम्रान पठाण,अब्दुल रियाज अब्दुल समद सौदागर, वृषाली राहुल बोंद्रे, रविंद्र नारायण डाळीमकर, मृत्युंजय संजय गायकवाड, मनोज सारंगधर लाहुडकर , सतीश मोतीराम गवई,बबन डिगांबर राऊत, विनायक रामभाऊ सरनाईक , शरद रमेश खपके,सिध्दार्थ अंकुश पैठणे,देवानंद पांडुरंग गवई,मिलींदकुमार सुधाकर मघाडे, नितिन रंगनाथ इंगळे-राजपूत,संजय धोंडु धुरंधर,अब्दुल वाहीद शे. इस्माईल, राजेंद्र सुरेश पडघान ( सर्व अपक्ष).
सिंदखेड राजा मतदारसंघ - डॉ. मनोरखा रशीदखा पठाण,शेख रफिक शेख शफी,अभय जगाराव चव्हाण,विजय प्रतापराव घोंगे, मनसब खान सादतमीर खान पठाण, राजेंद्र मधुकर शिंगणे, शिवाजी बाबुराव मुंढे,अशोक श्रीराम पडघान, ज्ञानेश्वर कैलास म्हस्के,नामदेव दगडू राठोड,सुनील तोताराम कायंदे, सुरज धर्मराव हनुमंते ,अंकुर त्र्यंबक देशपांडे, अलका रामप्रसाद जायभाये, भाई दिलीप ब्रम्हाजी खरात, प्रल्हाद रंगनाथ सोरमारे.(सर्व अपक्ष)शिवानंद नारायण भानुसे(संभाजी ब्रिगेड पार्टी),प्रकाश शिवाजी गीते(बहूजन समाज पार्टी) (Maharashtra assembly poll)
मेहकर मतदारसंघ- नरहरी ओंकार गवई, डॉ. सांची सिध्दार्थ खरात, प्रकाश गणपत अंभोरे, लक्ष्मण जानुजी घुमरे, मुरलीधर दगडू गवई,वामनराव सुर्यभान वानखेडे, डॉ. गोपालसिंह बछीरे, प्रकाश चिंधाजी गवई, डॉ. जानु जगदेव मानकर,कैलास कुरू खंदारे (सर्व अपक्ष),रजनीकांत सुधीर कांबळे (राष्ट्रीय समाज पक्ष).
खामगांव मतदारसंघ -अँड. रवींद्र भोजने,अमोल अशोक अंधारे, किरण रामचंद्र मोरे(सर्व अपक्ष)शिवशंकर पुरुषोत्तम लगर(महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
जळगाव जामोद मतदारसंघ - अमित रमेशराव देशमुख (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), अरुण भिकाजी निंबोळकर, पवन भाऊराव गवई,देवानंद शंकर आमझरे,मंगेश विश्वनाथ मानकर,डॉ. संदिप रामदास वाकेकर ( सर्व अपक्ष). यानुसार,सात विधानसभा मतदारसंघात एकूण ११५ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.