बुलढाणा : जिल्ह्यातील मलकापूर, बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगांव व जळगाव जामोद या सात विधानसभा मतदारसंघांसाठीची मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून चोख पोलीस बंदोबस्तात होणाऱ्या मतमोजणीतून सात विधानसभेच्या 115 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी 14 टेबल असणार आहे.
मलकापूर मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती, बेलाड यार्ड मलकापूर, बुलढाणा मतदारसंघाची मतमोजणी निवडणूक विभाग इमारत, तहसिल कार्यालयामागे बुलढाणा, चिखली मतदारसंघाची मतमोजणी तालुका क्रिडा संकुल बॅडमिंटन हॉल चिखली,सिंदखेडराजा मतदारसंघाची मतमोजणी वखार महामंडळाचे गोदाम कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर सिंदखेड राजा,मेहकर मतदारसंघाची मतमोजणी वखार महामंडळ गोदाम क्रमांक ५ मेहकर,खामगांव मतदारसंघाची मतमोजणी सरस्वती विद्यामंदिर हॉल खामगाव,जळगाव जामोद मतदारसंघाची मतमोजणी नवीन प्रशासकीय इमारत जळगाव जामोद येथे होईल.
मतदारांच्या संख्येनुसार मतमोजणीच्या फे-या होणार आहेत. यात मलकापूर २२ फेऱ्या , बुलढाणा २४ फेऱ्या , चिखली २३ फेऱ्या, सिंदखेड राजा २५फेऱ्या, मेहकर २५ फेऱ्या, खामगांव २३ फेऱ्या व जळगाव जामोद येथे २३ फेऱ्या होतील. प्रथम टपाली मतदानाची मतमोजणी होईल व त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीस सुरुवात होईल.
मलकापूर ७१.१७, बुलढाणा ६२.३९, चिखली ७२.०७,सिंदखेडराजा ७०.२२, मेहकर ६८.९७,खामगांव ७६.०६, जळगाव जामोद ७३.५४ असे एकूण ७०.६०टक्के अंतिम सरासरी मतदान झाले. २१ लक्ष ३४ हजार ५०० मतदारापैकी १५लक्ष ६हजार ९२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे.