Buldhana Crime News
बुलढाणा : कुख्यात वाळूतस्कर मनोज वाघ एक वर्षासाठी स्थानबद्ध File Photo

बुलढाणा : कुख्यात वाळूतस्कर मनोज वाघ एक वर्षासाठी स्थानबद्ध

विदर्भातील पहिलीच कारवाई, वाळूतस्करांनी घेतला कारवाईचा धसका

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : कुख्यात वाळूतस्कर मनोज उर्फ मनेष उर्फ मुन्ना वाघ (३५, रा. डिग्रस ता. देऊळगावराजा) याला एमपीडीए कायद्यानुसार एक वर्ष कालावधीसाठी अकोला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. वाळू तस्करावर करण्यात आलेली स्थानबद्धतेची ही विदर्भातील पहिली कारवाई आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या वाळू घाटांतून वाळूची तस्करी केली जात असल्याने शासनाचा कोट्यावधी रुपयांच्या महसूल बुडत आहे. वाळू तस्करांनी उच्छाद मांडल्याने अखेर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे.

Buldhana Crime News
Buldhana News: दारूसाठी बाप बनला निर्दयी! झोपलेल्या मुलावर घातले कुऱ्हाडीचे घाव

खडकपूर्णा नदीपात्रातील वाळू घाटांतून वाळूची चोरी करून अवैध वाहतूक व विक्री करणे, शासकीय कर्मचा-यांवर हल्ले करणे, शासकीय कामकाजामध्ये अडथळे निर्माण करणे आदी प्रकारचे अनेक गुन्हे मनोज वाघ याच्यावर दाखल आहेत. पोलिसांनी यापूर्वी अनेकवेळा त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याचे वर्तन सुधारले नाही. तो कायद्याला जुमानत नसल्याने याची गंभीर दखल घेऊन त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी वाळू तस्कर मनोज वाघ याला स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांना सादर केला. सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वत:च्या स्त्रोतांद्वारे माहिती मिळवल्यानंतर वाघ हा सराईत गुन्हेगार असल्याची खात्री झाल्याने जिल्हा दंडाधिकारी यांनी त्याला एक वर्षसाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश १ जुलैला पारित केला. पोलिसांनी आज २ जुलै रोजी वाघ याला अटक करून अकोला कारागृहात स्थानबध्द केले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news