Samruddhi Expressway Accident | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रकची अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक, चालक ठार

क्लिनर किरकोळ जखमी
Buldhana Samruddhi Expressway Truck Crash
Buldhana Samruddhi Expressway Truck CrashPudhari
Published on
Updated on

Buldhana Samruddhi Expressway Truck Crash

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर ट्रक चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रकने समोरील अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी (दि.४) पहाटे घडली. या भीषण अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहायक (क्लिनर) किरकोळ जखमी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक (क्र. आरजे-जीडी ४४१२) समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक २६९.४०० जवळून जात असताना चालक लेकराज याला पहाटे सुमारे ३.५३ वाजता झोपेची डुलकी लागली. त्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटून तो समोरील अज्ञात वाहनावर पाठीमागून धडकला. धडक इतकी जोरदार होती की ट्रकच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आणि चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात क्लिनर किरकोळ जखमी झाला.

Buldhana Samruddhi Expressway Truck Crash
Heavy Rainfall Buldhana | बुलढाणा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; जळगाव जामोदमध्ये २४ तासांत २०७ मिमीची नोंद

अपघाताची माहिती मिळताच मेहकरजवळील फरदापूर पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक सुनील सोळंके, सहायक पोलीस उपनिरीक्षक मंगेश खडसे तसेच पोलीस कर्मचारी निलेश राठोड, धीरज चंदन, मंगेश तंत्रे आणि गजानन जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी क्लिनरला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच अपघातग्रस्त वाहन हटवून समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news