Buldhana News : 'त्या'कथित खुनाच्या तपासातील निष्काळजीपणा उघड, 'एलसीबी'तील चौघांची तडकाफडकी उचलबांगडी..

खून झालेली तरुणी पोलिस ठाण्यात जिवंत हजर झाल्याने एलसीबीचे पथक पडले होते तोंडघशी
Jalgaon Jamod Girl Dead Body
प्रातिनिधीक छायाचित्रAI Image
Published on
Updated on

बुलढाणा : विवाहित तरूणीच्या कथित खुन प्रकरणी तीच्या वडील व भावाला पोलिसांनी अटक केली होती. मात्र ती कथित मृत तरुणी जिवंत हजर झाल्याने बुलढाणा एलसीबीचे तपास पथक तोंडघशी पडले. या गंभीर चुकीमुळे पोलीस दलाला धक्का बसला.

अखेर तपासात अक्षम्य निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांनी 'एलसीबी'च्या त्या तपास पथकातील उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस अंमलदार एजाज खान,अमोल शेजोळ,अजीस परसूवाले या चौघांची पोलीस नियंत्रण कक्षात तडकाफडकी उचलबांगडी केली आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी अप्पर पोलीस अधिक्षक श्रौणिक लोढा करणार आहेत.

जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात एका अज्ञात तरुणीचा शीर व धड वेगळे केलेला मृतदेह आढळून आला होता.त्या प्रकरणाचा तपास करतांना बुलढाणा एलसीबीच्या पथकाने खडकी (मध्यप्रदेश)येथील बेपत्ता झालेली विवाहित तरूणी शिवानी कळमेकर हिचा मृतदेह असल्याचा तर्क लावला. त्या कथित खुन प्रकरणात शिवानीचे वडील बापूराव व भाऊ अजय या दोघांना अटक केली.मात्र पोलिसांनी मृत दाखवलेली शिवानी जिवंत हजर झाल्याने एलसीबीच्या तपासाचे बिंग फुटले. प्रथमदर्शनी एलसीबीच्या तपास पथकातील चौघांचा गंभीर निष्काळजीपणा समोर आल्यामुळे त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news