Buldhana Crime: नांदुराजवळ अवैध देशी पिस्तुलासह दोघांना पकडले

एलसीबीची कारवाई; ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त
Buldhana Crime
Buldhana Crime: नांदुराजवळ अवैध देशी पिस्तुलासह दोघांना पकडलेPudhari
Published on
Updated on

बुलढाणा : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाईची मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने नांदुरा तालुक्यातील निमगाव फाट्यावरील माऊली बार येथे छापा टाकून देशी बनावटीच्या पिस्तुलासह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार मध्य प्रदेश राज्याच्या सीमेलगत असलेल्या सोनाळा, तामगाव, जळगाव जामोद आणि नांदुरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत देशी बनावटीची पिस्तुले, काडतुसे व इतर हत्यारांची तस्करी, खरेदी-विक्री तसेच बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेदरम्यान ११ सप्टेंबर रोजी एलसीबी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदुरा-जवळील निमगाव फाट्यावरील माऊली बार येथे छापा टाकण्यात आला. यावेळी रविंद्र विठ्ठल वेरूळकार (२९) आणि पवन कौतिकराव वेरूळकार (३०), दोघेही रा. येरळी, ता. नांदुरा, यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्या ताब्यातून ४५ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तूल, ३० हजार रुपये किमतीची दुचाकी आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news