मोताळा शहरात ATM फोडून चोरट्यांनी ७ लाखांची रक्कम केली लंपास...

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले
मोताळा शहरात ATM फोडून चोरट्यांनी ७ लाखांची रक्कम केली लंपास...
Published on
Updated on

बुलढाणा: मोताळा शहरातील तहसिल कार्यालय चौकात असलेले 'एसबीआय'चे एटीएम शुक्रवारच्या उत्तररात्री फोडून अज्ञात चोरट्यांनी त्यातील ७ लाख रुपया़ची रक्कम लंपास केली. आज शनिवारी हा सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली.

मोताळा शहरात ATM फोडून चोरट्यांनी ७ लाखांची रक्कम केली लंपास...
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

नागरिकांनी याबाबत बोराखेडी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तपासाला सुरुवात करत एटीएम मधील व आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत. एटीएम फोडून चोरी झाल्याच्या घटनास्थळी जिल्हा पोलिस अधिक्षक निलेश तांबे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबूलकर तसेच फौरेन्सिक टिमने भेट देऊन पाहणी केली व तपासाची दिशा ठरवली.

मोताळा शहरात ATM फोडून चोरट्यांनी ७ लाखांची रक्कम केली लंपास...
Chhatrapati Sambhajinagar Crime : निलंबित पोलिसाची थारमधून दहशत ! बिल्डरला अडवून लुटले

प्राथमिक माहितीनुसार,चोरट्यांनी सुमारे ७ लाखांची रक्कम लंपास केली आहे. पोलिसांच्या तपास पथकाला अद्यापपर्यंत चोरट्यांचा सुगावा लागला नाही. या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news