Buldhana Khadakpurna project :'तळ गाठलेल्या खडकपूर्णा प्रकल्पा'ची पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केली पाहणी

'पुढारी वेब'च्या बातमीची घेतली दखल.
Buldhana Khadakpurna project :'तळ गाठलेल्या खडकपूर्णा प्रकल्पा'ची पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केली पाहणी
Buldhana Khadakpurna project :'तळ गाठलेल्या खडकपूर्णा प्रकल्पा'ची पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केली पाहणी
Published on
Updated on

बुलढाणा:जिल्ह्यात अवर्षणामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात खरिप पिकस्थितीचा आढावा घेतला व केळवद, मालगणी,बेराळा, वसंतनगर,सरंबा व माळसावरगाव शिवारात शेताच्या बांधावर जाऊन खरिप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.तातडीने अचूक व वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतक-यांना शासनाकडून मदत देण्याची ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी या दौ-यात दिली.

'पुढारी वेब' च्या बातमीची दखल : खडकपूर्णा प्रकल्पाची पाहणी

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खडकपूर्णा प्रकल्पाने आताच तळ गाठला;केवळ ७.४४टक्केच जलसाठा."या शिर्षकाखाली 'पुढारी वेब' ने गुरूवारी दिलेल्या बातमीची दखल घेऊन पालकमंत्री मकरंद पाटील यांनी आज दुपारी देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पाची पाहणी करून, अत्यल्प असलेल्या जलसाठ्याबाबत चिंता व्यक्त केली.

Buldhana Khadakpurna project :'तळ गाठलेल्या खडकपूर्णा प्रकल्पा'ची पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केली पाहणी
Buldhana Khadakpurna project water storage : खडकपूर्णा प्रकल्पाने आताच तळ गाठला, केवळ ७.४४ टक्केच जलसाठा

खडकपूर्णा प्रकल्प क्षेत्रात यावर्षी ३४८मि.मी.पाऊस पडला असून प्रकल्पाचा संकल्पित जलसाठा हा ९३.४०द.ल.घ.मी.असतांना सद्यस्थितीत केवळ ६.९ द.ल.घ.मी.म्हणजे साठवण क्षमतेच्या केवळ ७.४४टक्के इतका अत्यल्प आहे.यामुळे खडकपूर्णा प्रकल्पावर विसंबून असलेले कालवे,उपसासिंचन योजना व पेयजल पुरवठा योजनांसमोर मोठे संकट उभे राहण्याची चिन्हे आहेत.

या भेटीत पालकमंत्री मकरंद पाटील यांनी खडकपूर्णा प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेतली व प्रकल्पातील पाणी प्राधान्याने पेयजल पुरवठ्यासाठी आरक्षित करण्याचे आदेश लवकरच काढले जातील असे सांगितले. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व आराखडा तयार करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार मनोज कायंदे, आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डाॅ.प्रविणकुमार देवरे, जि.प.चे सिईओ गुलाब खरात, एड.नाझेर काझी प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news