Buldhana Bribe Case | दहा हजारांची लाच घेतांना न्यायालयाचा 'बेलिफ' एसीबीच्या जाळ्यात

मेहकर येथील कारवाई, एसटी बसस्थानक परिसरात कारवाई
Bribe News
Bribe News
Published on
Updated on

बुलढाणा: मालमत्ता जप्तीचा वॉरंट न बजावण्यासाठी संबंधिताकडून दहा हजारांची लाच घेतांना मेहकरच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचा 'बेलिफ' लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)जाळ्यात रंगेहाथ अडकला.आज गुरूवार दि.६ऑगस्टच्या सायंकाळी मेहकर येथील एसटी बसस्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली.या नंतर परिसरात खळबळ उडाली.

याबाबत एसीबीच्या सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, एका दिवाणी दाव्यात संबंधित व्यक्तीची स्थावर मालमत्ता जप्त करण्यासाठी मेहकरच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने 'वॉरंट 'काढला होता. वॉरंट बजावण्यासाठी गेलेला दिवाणी न्यायालयाचा 'बेलिफ' जगदीश सुखदेव राऊत (३१,रा सिंदखेड राजा याने वॉरंटची अंमलबजावणी न करता परत जायचे असेल तर १५हजार रूपयांच्या लाचेची सुरूवातीला मागणी केली.

Bribe News
Buldhana news: आश्चर्यकारक! महिलेने एकाच वेळी दिला ४ बाळांना जन्म; घरातच झाली प्रसूती, डॉक्टरही चक्रावले

संबंधित व्यक्तीने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग(एसीबी) बुलढाणा कार्यालयात तक्रार नोंदवली. त्या तक्रारीची आज ६ऑगस्टच्या दुपारी मेहकर येथे पडताळणी करण्यात आली. दरम्यान दोघांमध्ये तडजोड होऊन १०हजारांची लाच देण्याचे ठरले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास एसीबीने मेहकर एसटी बसस्थानक परिसरात सापळा लावला. तक्रारदाराकडून १०हजार रूपयांची लाच घेतांना 'बेलिफ ' जगदीश राऊत याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपी जगदिश राऊतवर मेहकर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले, पोलीस निरीक्षक रमेश पवार, पोका. शैलेश सोनवणे, पंढरी शेळके, नितीन शेटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news