Buldhana Ganja Disposal | बुलढाणा जिल्ह्यात ११ ठिकाणी जप्त केलेल्या ८०० किलो गांजाची विल्हेवाट

बुटीबोरी (जि. नागपूर) येथील ड्रग्ज डिस्पोजल युनिटमध्ये गांजा नष्ट
800 kg cannabis disposal
बुटीबोरी (जि. नागपूर) येथील ड्रग्ज डिस्पोजल युनिटमध्ये गांजाची विल्हेवाट लावण्यात आली.(Pudhari Photo)
Published on
Updated on

Buldhana police seized 800 kg cannabis disposal

बुलढाणा: पोलिसांनी विविध कारवायात जप्त केलेले अंमली पदार्थ कुठे ठेवले जातात?पुढे त्यांचे काय होते?असे कुतूहलाचे प्रश्न लोकांना अनेकवेळा पडत असतात.याविषयी उकल करणारी माहिती समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात पोलिसांनी ११ ठिकाणी जप्त केलेल्या ८०० किलो गांजाची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन क्षेत्रात एनडीपीएस कायद्यानुसार ११ गुन्ह्यात जप्त केलेला प्रतिबंधित अंमली पदार्थ असलेला ८०० किलो ६४६ ग्राम गांजा केंद्रीय गोदामात संकलित करण्यात आला होता. जिल्हा पोलिस दलाने आता तो साठा रितसर नष्ट केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या 'मिशन परिवर्तन मोहिमे'त २६ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या सव्वातीन महिन्याच्या काळात पोलिसांच्या ११ कारवायांत हा गांजा जप्त करण्यात आला होता.

800 kg cannabis disposal
Buldhana Superintendent of Police | बुलढाणा पोलीस दलात अभूतपूर्व पेचप्रसंग: खुर्ची एक 'SP' दोन; विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष

पोलिस महासंचालक व पोलिस महानिरीक्षक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स मुंबई यांच्या निर्देशानुसार,जप्त केलेला अंमली पदार्थ गांजाची कायदेशीर निकष व नियमाप्रमाणे विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया करण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्राधिकृत केलेल्या बुटीबोरी (जि. नागपूर) येथील ड्रग्ज डिस्पोजल युनिटमध्ये गांजाची विल्हेवाट लावण्यात आली.

यावेळी जिल्हास्तरीय ड्रग्ज डिस्पोजल समितीचे सदस्य‌ व अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, पोलीस उपअधीक्षक (गृह) बाळकृष्ण पावरा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबूलकर आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news