Amaravati News | अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ: सोमवारी ११ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे केली दाखल

Maharashtra Legislative Council Election
Maharashtra Legislative Council ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

बुलढाणा: विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी सोमवार ५ ऑक्टोबर रोजी ११ उमेदवारांनी १८ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. आतापर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या १६ झाली आहे.

आज नामनिर्देशन पत्रे दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये दिलीप भिमराव कडू (अपक्ष), डॉ. प्रशांत विश्वेश्वर विघे(अपक्ष), दत्तात्रय लहाने ( शिवसेना उबाठा), सुरेश देवकर ( समाजवादी गणराज्य पार्टी ) गजानन गोविंदराव डोके ( भारतीय जनसम्राट पार्टी) भोयर चंद्रशेखर उर्फ शेखर मनोहरराव ( भाजपा व अपक्ष) , सुनील दुर्गादास राठोड (अपक्ष), सुमित सुरेशराव पवार ( अपक्ष), गजानन रामचंद्र उल्हे (अपक्ष), किरणराव सरनाईक ( शिवसेना व अपक्ष), अविनाश मधुकर बोर्डे (अपक्ष) यांचा समावेश आहे.

आज १५ व्यक्तींनी ३० नामनिर्देशनपत्रांची उचल केली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार, मंगळवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रांची उचल तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. बुधवार ७ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून, शुक्रवार ९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news