

Khat Road Car Accident
भंडारा: भरधाव कार अचानक उलटल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (दि.२३) पहाटे १:३० वाजताच्या सुमारास शहरातील खात रोडवरील गुंजेपार क्रॉसिंगजवळ ही घटना घडली.
रोहित प्रदीप शर्मा (२५) असे मृताचे नाव आहे. तो भंडारा येथील सिव्हिल लाईन येथील रहिवासी होता. हरिश सूर्यवंशी (वय ३२) आणि त्याचा मित्र रोहित शर्मा रात्री कारने घरी परतत होते. रोहित कार चालवित होता. गुंजेपार क्रॉसिंगजवळ अचानक कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात रोहितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. भंडारा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.