भंडारा : लाखनी तालुक्यात पेंढरी आणि गोंडसावरी या गावांमध्ये तलावामध्ये बुडून दोघांचा मृत्यू झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. ह्या घटना शुक्रवारी (दि.18) घडल्या. रोहित प्रकाश कुंभरे (वय.17, रा. पेंढरी-मोठी) आणि विरेंद्र हरिभाऊ राऊत (वय.22, रा. गोंडसावरी) अशी मृत मुलांची नावे आहेत. यामध्ये रोहित हा त्याच्या लहान भावासोबत शेळ्या चारण्याकरीता गेला होता. यावेळा पोहताना तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला.
विरेंद्र हा घरामध्ये नव्हता तेव्हा घरच्यांनी त्याचा शोध घेतल्यानंरतर तो तळाच्या पाळीवर गेल्याचे नागरिकांनी सांगितले. तेव्हा पाळीवर शोध घेतल्यानंतर त्याचे चप्पल अंगातील कपडे पाळीवर दिसले. त्यावेळी रात्र झाल्याने दिनांक 19 ऑक्टोबरला सकाळी समाजातील लोकांनी जाळे टाकून शोध घेतले असता वीरेंद्र राऊत यांचा मृतदेह जाळीमध्ये अडकला. यानंतर त्याचा मृतदेह लाखनी पोलिसांच्या उपस्थित बाहेर काढून शवविच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेचा अधिक पोलीस हवालदार दिगांबर तलमले करीत आहे.

