अन् आईवडिलांची भेट झालीच नाही; सख्ख्या भावांचा अपघातात मृत्यू

Bhandara Accident News | देव्हाडा येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक
two brothers die in bhandara devhada
देव्हाडा येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. File photo
Published on
Updated on

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. ही घटना देव्हाडा येथील साखर कारखाना मार्गावर घडली. प्रज्वल कृष्णकुमार साठवणे (वय २०) व निखिल कृष्णकुमार साठवणे (वय २२, दोघे रा. करडी) अशी मृत भावांची नावे आहेत. (Bhandara Accident News)

याबाबत अधिक माहिती अशी की, दोघेही भावंड स्कुटीने देव्हाडाकडे जात असताना साखर कारखान्याच्या मार्गावर अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात प्रज्वल साठवणे याचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर निखिल साठवणे याचा भंडारा येथील रुग्णालयात मृत्यू झाला.

कृष्णकुमार साठवणे हे शासकीय नोकरदार आहेत. त्यांना दोन मुले व मुलगी आहे. हे दोन्ही भावंड बाहेर शिक्षण घेत होते. दोन्ही भावंड आईवडिलांना भेटायला आली होती. परंतु, अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची करडी पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार विलास मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (Bhandara Accident News)

two brothers die in bhandara devhada
भंडारा: पुराचा १७० गावांना फटका, ४ हजार हेक्टर शेती बाधित

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news