Bhandara Farmers Protest | दुष्काळग्रस्त घोषणेसाठी सर्वपक्षीय गर्जना: हरदोली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन

शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तुमसर तालुक्यातील हरदोली येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले
Tumsar Drought Declaration Protest
Tumsar Drought Declaration ProtestPudhari
Published on: 
Updated on: 

Tumsar Drought Declaration Protest

भंडारा:
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (दि. ७) तुमसर तालुक्यातील हरदोली येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. धानाला बोनस द्यावा, तुमसर व मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, दोन लाख रुपयांपर्यंत जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी सरसकट लागू करावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर ५० हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम तातडीने द्यावी, यासह विविध मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या.

हे आंदोलन कोणत्याही राजकीय नेत्याच्या नेतृत्वाखाली नसून शेतकऱ्यांनी स्वत: सामूहिक नेतृत्वातून उभारल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. सिहोरा, बपेरा, चुल्हाड तसेच संबंधित जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकºयांनी रस्त्यावर ठिय्या देत रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.

Tumsar Drought Declaration Protest
Bhandara News : साकोलीत ५०० ट्रॅक्टरसह शेतकऱ्यांचा एल्गार! धानाला प्रतिहेक्टरी २० हजार बोनस आणि ३५०० रुपयांच्या दराची मागणी

आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. रस्त्यावर बसून आंदोलन करणाºया काही शेतकºयांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस व्हॅनमधून सिहोरा पोलिस ठाण्यात नेले. शेतकºयांच्या मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news