Bhandara Tiger Attack | आईच्या डोळ्यांदेखत वाघाची झडप! पाळण्यातून सहा महिन्यांच्या चिमुकल्याला उचलले; भंडाऱ्यात हृदयद्रावक घटना

अड्याळ वन परिसरातील तिर्री येथील घटनेने ग्रामस्थांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण
Adyal Forest Range Tiger Carries Away Baby
Adyal Forest Range Tiger Carries Away Baby AI Photo
Published on: 
Updated on: 

Adyal Forest Range Tiger Carries Away Baby

भंडारा : घरात पाळण्यात झोपलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याला वाघाने घरात शिरून उचलल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी सुमारे ७ च्या सुमारास अड्याळ वन परिसरातील तिर्री येथे घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचा काही वेळातच मृत्यू झाला. अद्विक अभिमन बोंदरे (वय ६ महिने) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तिर्री येथील अभिमन बोंदरे यांना दोन मुली असून अद्विक हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. शुक्रवारी सायंकाळी आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत होती, तर अद्विक घरातील पाळण्यात झोपला होता. याचवेळी अचानक वाघाने घरात प्रवेश करून पाळण्यात झोपलेल्या अद्विकला उचलले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. आईने आरडाओरड केल्यानंतर वाघ घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, तोपर्यंत चिमुकल्याचा मृत्यू झाला होता.

Adyal Forest Range Tiger Carries Away Baby
Bhandara News : लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षांचा सश्रम कारावास!

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी जमली. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूमुळे बोंदरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

आठवडाभरातील दुसरी घटना

अड्याळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाच्या वावराच्या घटना समोर येत आहेत. यापूर्वी ५ नोव्हेंबर रोजी लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अवघ्या आठवडाभरात तिर्री येथे वाघाच्या हल्ल्यात सहा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Adyal Forest Range Tiger Carries Away Baby
Bhandara News | लोखंडी गेट अंगावर कोसळून चिमुरडीचा मृत्यू

कायमस्वरूपी उपाययोजनांची ग्रामस्थांची मागणी

तिर्री येथील घटनेनंतर जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच वाढले आहे. लहान मुले, महिला तसेच शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वनविभागाने परिसरात गस्त वाढवावी, वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे, ग्रामस्थांमध्ये जनजागृती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच मृत बालकाच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.