भंडारा : जीर्ण इमारतीचे पोर्च खचून नऊ महिला जखमी

गणपती विसर्जवेळी दुर्घटना
Bhandara News
जीर्ण इमारतीचे कोसळलेले पोर्चPudhari Photo
Published on
Updated on

भंडारा : गणपती विसर्जन बघण्यासाठी जीर्ण इमारतीवर चढून विसर्जनातील डीजेचा आनंद घेताना अचानक जीर्ण इमारतीचे पोर्च खचला. या घटनेमध्ये ९ महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही घटना लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथे बुधवारी (दि.१८) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. सिमेंटचे पोर्च खाली टिनाचे शेड असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अनिता राजेंद्र सोनवणे (वय.४५), मिना टिळ्कशिंग बैस(वय.४०), नंदिनी सुरेश शेंद्रे (वय.३०), अर्चना विजय देव्हारे (वय.४०) रिया रेवाचंद शेंद्रे (वय.१५) यांचा समावेश असून त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.

Bhandara News
लखनऊत इमारत कोसळली; मृतांची संख्या ८ वर

बारव्हा पेठ येथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे वतीने गणेश उत्सव मोठया धुमधडाक्यात मनविण्यात आला. दहा दिवस विविधरंगी कार्यक्रम साजरे करण्यात आले. बुधवारी (दि.१८) गणरायाचे विसर्जनासाठी धुमाल पार्टीचे डी. जे. व विविधरंगी झाकी, लेझीम च्या तालावर भाविक भक्त थिरकत असतानाच अचानक जीर्ण इमारतीचे छत कोसळले. टिनाचे शेडखाली अनेक महिला उभ्या होत्या. त्यांच्यावर टिनाचे शेड कोसळले. मात्र सिमेंटचे छताखाली टिनाचे शेड असल्यामुळे नऊ महिला किरकोळ जखमी झाल्या. लागलीच जमावाने सर्व टिनाचे शेडच उचलून धरले व जखमींना तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बारव्हा येथे दाखल करण्यात आले. जास्त दुखापत असल्यामुळे लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news