भंडारा येथे आईचा खून करून मृतदेह फेकला जंगलात; मुलाविरूद्ध गुन्हा

Bhandara murder case | मृतदेह पोत्यात भरुन जंगलात फेकला
mother killed by son in Bhandara
दांडेगाव जंगलात आईचा खून करून मृतदेह फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. file photo
Published on
Updated on

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव जंगलात एका अज्ञात महिलेचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला होता. सदर महिलेची ओळख पटली असून तिच्याच मुलाने तिचा खून करुन मृतदेह पोत्यात भरुन जंगलात फेकून दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी मुलाविरुद्ध दिघोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चित्रलेखा उर्फ रेखा अरूण वासनिक (वय ४५, रा. दिघोरी मोठी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर सुमित अरूण वासनिक (वय २५) असे संशयित मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रलेखासोबत मुलगा सुमित नेहमीच भांडण करीत होता. ६ मे २०२४ ते २६ सप्टेंबर २०२४ दरम्यान सुमितने दररोजच्या भांडणावरुन आई चित्रलेखाचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह प्लास्टीक पोत्यात भरुन १५ किलोमीटर लांब दांडेगावच्या जंगलात फेकून दिला. पोलिसांनी आरोपी सुमित वासनिकविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला असून तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम करीत आहेत.

mother killed by son in Bhandara
भंडारा जिल्ह्यात शाळा बंद आंदोलन: हजारो शिक्षकांचा सहभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news