Narendra Bhondekar | नाचताना स्टेज तुटला आणि आमदार नरेंद्र भोंडेकर थेट खाली पडले (पहा व्हिडीओ)

पवनी शहरात शहनाज अख्तर यांच्या कार्यक्रमादरम्यान दुर्घटना : भोंडेकर किरकोळ जखमी
Narendra Bhondekar
आमदार नरेंद्र भोंडेकर
Published on
Updated on

भंडारा - सध्या नवरात्र सुरू असून भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावतीने पवनी शहरात शहनाज अख्तर यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गाण्याचा कार्यक्रम सुरू असताना आमदार व कार्यकर्ते स्टेजवर चढले व नाचत असताना स्टेज तुटला. यात आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह काही कार्यकर्ते देखील खाली कोसळले. यात काहींना जास्त दुखापत झाली असल्याचे बोलले जात आहे. यात नरेंद्र भोंडेकर यांना किरकोळ इजा झाली असल्याचे समजते.

भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावतीने पवनी शहरात शहनाज अख्तर यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गाण्याचा कार्यक्रम सुरू असताना आमदार व कार्यकर्ते स्टेजवर चढले व नाचत असताना स्टेज तुटला. यात आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह काही कार्यकर्ते देखील खाली कोसळले. घटना घडताच उपस्थित पोलिस कर्मचारी तसेच कार्यकर्त्यांनी मदतीसाठी धाव घेतली.

पवनी येथे आयोजित होत असलेल्या विदर्भ काशी पवनी महोत्सवाचे आज समारोप करण्यात आले. पाच दिवसीय या महोत्सव दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, ज्यात मॅरथॉन दौड, स्टँडिंग कॉमेडीचा बादशाह सुनील पाल व भजन गायक शहनाज अख्तर हे पवनी करीता आकर्षण ठरले. आज या महोत्सवाचे समारोप गरबा व दांडिया स्पर्धेने करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news