Bhandara News | महाराष्ट्रात धानासाठी थेट पेमेंट प्रणाली सुरू

आमदार डॉ. परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखालील छत्तीसगड अभ्यास दौऱ्याच्या अहवालाला यश ऱ्या
Rice Seed
Rice SeedPudhari
Published on: 
Updated on: 

भंडारा : धान उत्पादक शेतकºयांना शासकीय धान खरेदी केंद्रांवर धान विक्री केल्यानंतर आपल्या हक्काच्या पैशांसाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत होती. ही समस्या दूर करून शेतकर्यांना वेळेत पैसे मिळावेत, यासाठी आमदार डॉ. परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखाली छत्तीसगड राज्याचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यादरम्यान छत्तीसगडमधील धान खरेदी आणि शेतकºयांना थेट पैसे अदा करण्याच्या प्रणालीचा अभ्यास करण्यात आला.

त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही पारदर्शक आणि गतिमान ‘थेट पेमेंट प्रणाली’ राबविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने विकसित केलेल्या या प्रणालीमुळे शासकीय खरेदी केंद्रांवर शेतमालाची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अवघ्या ३ ते ५ दिवसांत पैसे जमा होऊ लागले आहेत.

या प्रणालीअंतर्गत राज्यभरातील ३ हजार ४९० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये आतापर्यंत ३२ कोटी ६७ लाख ४४ हजार रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, पुढील हंगामाच्या तयारीसाठी आवश्यक असलेली आर्थिक उपलब्धता वेळेत होण्यास मदत होत आहे.

यापूर्वी शासकीय खरेदी केंद्रांवर धान विक्री केल्यानंतर चुकारे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ६० ते १०० दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे बियाणे, खते, शेतीची मशागत तसेच इतर आर्थिक गरजांसाठी शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, नव्या थेट पेमेंट प्रणालीमुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान झाली आहे.

विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना आणखी जलद आर्थिक लाभ मिळावा यासाठी ही कालमर्यादा कमी करून अवघ्या ४८ तासांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे उद्दिष्ट अन्न व नागरी पुरवठा विभागाने ठेवले आहे.

छत्तीसगडमधील यशस्वी धान खरेदी व्यवस्थेचा अभ्यास करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने झालेला हा प्रयत्न महत्त्वपूर्ण मानला जात आहे. शेतकऱ्यांच्या घामाचे मोल वेळेत त्यांच्या हातात पोहोचावे, या उद्देशाने सुरू झालेली ही थेट पेमेंट प्रणाली धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.