image of Leopard
Leopard Attack Bhandara Newsfile photo

Leopard Attack Bhandara News | शौचास जाणाऱ्या व्यक्तीवर बिबट्याचा हल्ला, आरडाओरडा केल्याने बिबट्याने ठोकली धूम

Leopard Attack Bhandara News | शौचास जाणाऱ्या व्यक्तीवर बिबट्याचा हल्ला केला. आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली.
Published on

Leopard Attack Bhandara News

भंडारा - शौचास जात असलेल्या एका व्यक्तीवर बिबट्याने झडप घेत त्याच्या हाताला चावा घेतला. हाताला धक्का देत इसमाने आपली सुटका केली. आरडाओरड केल्यामुळे बिबट्या घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना नागझिरा वन्यजीव अभयारण्यालगत असलेल्या पिटेझरी येथे घडली. गिरधारी बळीराम उईके (वय ३५, रा. पिटेझरी) असे जखमीचे नाव आहे.

बळीराम उईके हा पहाटे ४:१५ वाजता दरम्यान घरामागील शौचालयात जात असताना जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने गिरधारी भयभीत झाला. त्याने जोरात हाताला धक्का दिला व बिबट्याच्या तोंडातून हात सोडवले. यात बिबट्याने हाताला चावा घेतल्यामुळे गिरधारी जखमी झाला. त्याने आरडाओरड करताच कुटुंबीय व शेजारी लोक धावून आले. त्यांनी आरडाओरोड केल्यामुळे बिबट्या तेथून पळून गेला.

गिरधारीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे दाखल करण्यात आले. या घटनेमुळे गावात दहशत पसरलेली आहे. जखमी गिरधारीला वन्यजीव विभागाने पंचनामा करून आर्थिक सहाय्य देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलाच्या बाहेर येत असतात. त्यामुळे जंगलव्याप्त परिसरातील नागरिकांनी शेतात जातानी सतर्कता बाळगावी, एकट्याने जंगल परिसरात जाऊ नये, असे आवाहन साकोलीचे सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news