

जन्मदात्या बापानेच स्वत:च्या मुलाची हत्या केल्याची घटना शनिवरी (दि.10) रोंघा येथे घडली. एकनाथ धनराज ठाकरे (वय.३४, रा. गोवर्धन नगर तुमसर) असे मृताचे नाव आहे. घटनेच्या दिवशी मृतक मुलगा आपल्या गावी कामानिमित्त आला होता. यावेळी संशयित आरोपी धनराज डोमा ठाकरे (वय. ५८, रोंघा) याच्याशी संपत्तीच्या वादातून शाब्दिक बाचाबाची झाली. हा शाब्दिक वादाचे रुपांतर भांडणामध्ये झाले. यावेळी राग अनावर झालेल्या वडिलांनी कुऱ्हाडीने मुलाच्या डोक्यावर केला. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळ गाठून संशयित आरोपी पित्याला ताब्यात घेतले. तर पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणी करीता तुमसर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केले आहे.
मृत एकनाथ ठाकरे तुमसर येथील लघु पाठबंधरे मृदा व जलसंधारण विभागात कामाला होता. त्यामुळे सध्या तो सह परिवार तुमसर शहरातील गोवर्धन नगरात वास्तवास होता. मिळालेल्या माहितीनुसार मृतक आर्थिक संकटात असल्याने तो नेहमीच आरोपी वडिलांना पैशाकरीता तकादा लावत होता. टेलर काम करणारे संशयित आरोपी धनराज हा नेहमीच विरोध करत होता. मात्र शनिवारी पैशाच्या वाद विकोप्याला जावून हत्येचा थरार घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.