भंडारा : मोहाडीत राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा

Maharashtra Assembly Election| मतदान केंद्रावरच कार्यकर्ते एकमेकांना भिडले
Bhandara News
मोहाडीत राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा झाला.
Published on: 
Updated on: 

भंडारा : जिल्ह्यातील तुमसर विधानसभा क्षेत्रातील मोहाडी येथील मतदान केंद्रावर आज (दि.२०) राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील प्रकार टळला. ही घटना मोहाडी येथील जिल्हा परिषद शाळेत घडली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे काही कार्यकर्ते मतदान केंद्राच्या आवारात चारचाकी वाहन घेऊन आल्याने शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत त्यांना जाब विचारला. यावरुन दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. सुमारे दोनशे कार्यकर्त्यांची गर्दी मतदान केंद्र परिसरात झाली. त्यांच्यात हाणामारीला सुरुवात झाली. उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या वादंगामुळे मतदान केंद्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तात्काळ पोलिसांनी धाव घेत कार्यकर्त्यांची समजूत काढली. सुमारे अर्धा तासानंतर प्रकरण निवळले. या प्रकाराची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी तात्काळ मोहाडी येथे धाव घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news