Bhandara Robbery | वैनगंगा पुलावरील जबरी लूट प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

महामार्गावरील दरोडा व तोडफोड प्रकरणात संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा फास
  Robbery
Robbery file photo
Published on: 
Updated on: 

Wainganga Bridge Robbery Absconding Accused Arrested

भंडारा: वैनगंगा नदीच्या पुलावर ट्रक अडवून चालकाला मारहाण करत जबरी लूट तसेच वाहनाची तोडफोड केल्याच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना भंडारा पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत कारवाई सुरू असून, सलग दोन दिवसांत केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी वतुर्ळात खळबळ उडाली आहे.

१७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ०१:३० वाजताच्या सुमारास फिर्यादी अकरम खान उसन खान पठाण, वय ४५ वर्षे, रा. हासन, राज्य कर्नाटक हे ट्रकने रायपूरहून नागपूरकडे जात होते. कोरंभीजवळील वैनगंगा नदीच्या पुलावर आरोपी चिराग नमोद गजभिये (रा. रमाबाई आंबेडकर वार्ड, भंडारा), मोनार्च प्रकाश शेंडे (रा. विद्यानगर) आणि अस्मित उर्फ रामा रामेश्वर कुकडे (रा. वडोदा, ता. मौदा) यांच्यासह इतर १२ साथीदारांनी त्यांचा ट्रक अडवला.

  Robbery
Bhandara News : भंडाऱ्यात मानव-वन्यजीव संघर्षाचा उद्रेक; वर्षभरात ११ जणांचा मृत्यू, सहा महिन्यांच्या बालकाचाही बळी

त्यानंतर लाकडी दांड्यांनी ट्रकच्या काचा फोडून अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले. चालकाला खाली ओढून मारहाण करत खिशातील १५ हजार रुपये जबरीने काढून घेण्यात आले.

गुन्हा दाखल झाल्यापासून मोनार्च प्रकाश शेंडे ( वय २५, रा. विद्यानगर, गणेशपूर) तसेच अस्मित उर्फ रामा रामेश्वर कुकडे हे पोलिसांना चकवा देत फरार होते. २४ नोव्हेंबर रोजी अस्मित उर्फ रामा रामेश्वर कुकडे हा (वडोदा, ता. मौदा) येथे असल्याची माहिती मिळताच मौदा पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी मोनार्च प्रकाश शेंडे हा मेंढा, (मानेगाव बाजार) येथील मंडई कार्यक्रमात येणार असल्याची माहिती मिळताच गर्दीतून सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.