

भंडारा : वरठी राष्ट्रीय महामार्गावर दाभा परिसरात ट्रक व कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. हा अपघात सोमवारी (दि.६) मध्यरात्री तीनच्या सुमारास घडला. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा चक्काचूर झाला असून ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भूषण काळबांधे (वय ३१ रा. वरठी, ) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, भूषण काळबांधे व रज्जाक पठाण हे दोघे मित्राच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी मध्यरात्री तीन वाजता वरठीकडून भंडाराच्या दिशेने कारने निघाले होते. दरम्यान, भंडारा कडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकला या कारची समोरासमोर जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की कारच्या सामोरच्या भागाचा चक्काचूर झाला. व चालक भूषण काळबांधे याचा जागीच मृत्यू झाला तर रज्जाक पठाण हा गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.