Bhandara Crime | रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणारी टोळी गजाआड

पोलिसांनी रानडुकराचे मांस जप्त केले असून तिन्ही आरोपींविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल
 Crime
Crime(File Photo)
Published on
Updated on

Tumsar Wild Boar Poaching
भंडारा : तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नाकाडोंगरी बीट क्रमांक २ मध्ये रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी रानडुकराचे मांस जप्त केले असून तिन्ही आरोपींविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी (दि.८) रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकाºयांना खात्रीलायक माहिती मिळाली की, नाकाडोंगरी बीटमधील खाजगी प्लॉट क्रमांक ३३९ मध्ये एका रानडुकराची शिकार करून त्याच्या मांसाची विल्हेवाट लावण्याची तयारी सुरू आहे.

 Crime
Bhandara News | बोगस दिव्यांग प्रमाणपत्र भोवले; तीन अधिकारी बडतर्फ, तीन कर्मचारी निलंबित

या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाड टाकली. त्यावेळी तिथे सुमारे दोन वर्ष वयाचा एक नर रानडुक्कर मृतावस्थेत आढळला आणि आरोपी त्याचे मांस कापण्याच्या तयारीत होते. छाप्यादरम्यान हर्षद किशोर राऊत (२८, रा. सीतासावंगी) याला पथकाने रंगेहात पकडले, मात्र इतर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

वनविभागाच्या पथकाने तातडीने शोधमोहीम राबवून फरार झालेल्या अजय मयपत मेश्राम (२७, रा. सीतासावंगी) आणि जितेंद्र रुधा तांडेकर (३०, रा. कवलेवाडा) यांनाही सीतासावंगी परिसरातून अटक केली. पशुवैद्यकीय अधिकाºयांच्या उपस्थितीत मृत रानडुकराचे शवविच्छेदन करण्यात आले असून, तपासासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. जप्त केलेले मांस नियमानुसार जाळून नष्ट करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news