

भंडारा- लाखांदूर तालुक्यातील खैरी / पट येथील डाकराम गोपीचंद देशमुख या शेतकऱ्यावर हल्ला करून ठार करणारा वाघ अखेर जेरबंद झाला आहे. त्या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाचे तीन दिवसांपासून प्रयत्न सुरु होते.
भंडारा येथील बचाव पथक. यांच्यासह लाखांदूर वनविभाग अधिकारी यांनी घटनास्थळी १०० होऊन अधिक कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र शोधमोहिम राबवून वाघाला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. यासाठी वन विभागाकडून वाघाने शिकार केली होती त्यांच्या आजूबाजूला मचान बांधून घटनास्थळी जनावर बांधून ठेवले होते. मंगळवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान तो नरभक्षी वाघाने शिकारीजवळ येऊन जनावरावर हल्ला केला. त्याचवेळी मचानीवर लपून असलेल्या शार्प शूटरने वाघाला बेशुद्ध केले. वाघ बेशुद्ध होताच तात्काळ वन विभागाचे कर्मचाऱ्यांना बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वाघाला जेरबंद करून त्यांची रात्रीच नागपूर येथे रवानगी करण्यात आली.