

भंडारा :- सुटे पैशांसाठी महिला वाहकाने प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना लाखनी बसस्थानकावर घडली. प्रवाशाला लाथाबुक्याने मारताना बस स्थानकावर प्रवाशांनी व्हिडिओ काढला व व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या घटनेचा प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशाला सुट्या पैशांसाठी मारहाण करणाऱ्या महिला वाहकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील महिला वाहकाकडून मारहाणीची दुसरी घटना आहे. आठ दिवसांपूर्वी एका महिला वाहकाने विद्यार्थिनीचे केस ओढून मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर ही घटना समोर आल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्या महिला वाहकावर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.