Bhandara Tiger Captured | आयुध निर्माणी परिसरात दहशत माजविणारा वाघ अखेर जेरबंद

आयुध निर्माणी परिसरात होता वावर, अनेक प्राण्यांची केली शिकार, नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास
Tiger Terror Bhandara
वाघाला अखेर वन विभागाने जेरबंद केले Pudhari
Published on
Updated on

Tiger Terror Bhandara

भंडारा: जवाहरनगर आयुध निर्माणी परिसर व लगतच्या पेवठा, साहुली व अन्य गावात काही महिन्यांपासून दहशत निर्माण करणाऱ्या आणि अनेक पाळीव प्राण्यांचा जीव घेणाऱ्या वाघाला अखेर वन विभागाने जेरबंद केले आहे. अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर ही कारवाई यशस्वी झाली असून, परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

मागील तीन ते चार महिन्यांपासून जवाहरनगर परिसरात वावरणाºया या वाघाने पेवठा, साहुली, परसोडी येथील शेतकºयांच्या पाळीव प्राण्यांना ठार केले होते. १० जुलै रोजी हा वाघ नांदोरा झिरी तलावाजवळ एका नागरिकाला दिसला. त्या व्यक्तीने जीव धोक्यात घालून स्वत:ची सुटका करून घेतली होती. त्यानंतर या वाघाची दहशत अधिकच वाढली.

Tiger Terror Bhandara
Bhandara Bribe News | करडी पोलिस ठाण्यातील हवालदार एसीबीच्या जाळ्यात!

१४ जुलै रोजी हा वाघ जवाहरनगर आयुध निर्माणीच्या मुख्य गेटजवळील हिल टॉप रस्त्यावर वन्यप्राण्याची शिकार करीत असताना आयुध निर्माणी कर्मचाºयाच्या नजरेस दिसला. त्यांनी लगेच ही बाब निर्माणी प्रशासनाला दिल्याने निर्माणी प्रशासनाने वन विभाग भंडारा यांना कळविली. तात्काळ वन विभागाचे अधिकारी फौजफाट्यासह त्याठिकाणी आले.

रात्रीच्या अंधारात सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख, वनपरिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे, पशुवैद्यकीय अधिकारी विठ्ठल हटवार, शिघ्र कृती दल सदस्य, जवाहरनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, आयुध निर्माणी अधिकारी व कर्मचारी, पेवठा पोलिस पाटील चंद्रभान हटवार, नागरिक यांचे अथक परिश्रमानंतर या वाघाला रात्री १० वाजताच्या सुमारास जेरबंद करण्यात आले. वन विभागाच्या रेस्क्यू टीमने विशेष मोहीम राबवून या वाघाला डार्ट मारुन बेशुद्ध करत जेरबंद केले. हा वाघ चार वर्षाचा नर जातीचा असल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news