Bhandhara Ordnance Factory
आयुध निर्माणीFile Photo

भंडारा आयुध निर्माण स्फोट प्रकरणात चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

Bhandhara Ordnance Factory | निष्‍काळजीपणाचा ठपका
Published on

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर आयुध निर्माणीमध्ये 24 जानेवारी 2025 रोजी मोठा स्फोट झाला. या स्फोटाची भीषणता इतकी तीव्र होती की, त्याचा आवाज जवळपास ३-४ किलोमीटरपर्यंत गेला. नागरीक भयभीत होऊन रस्त्यावर थांबले, तर काही जण घराबाहेर धावले. या स्फोटात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला. या स्फोटासाठी जवाहरनगर आयुध निर्माणीतील चार अधिकाऱ्यांसह इतरांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोट प्रकरणाच्या एकंदरीत चौकशीत आयुध निर्माणी जवाहरनगर येथील आरएक्स विभागातील एलटीपीई सेक्शनच्या ईमारत क्र. 23 मध्ये असलेल्या एक्सस्ट्रूमिक्स मशीन व त्यातील उपकरणामध्ये बिघाड होत होता. परंतू या मशीनचे दुरुस्तीकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले. या मशीन व उपकरणाची नियमित साफसफाई व देखभाल याकडे दुर्लक्ष केल्याने, निष्काळजीपणामुळे एलटीपीई सेक्शन मधील बिल्डींग क्र. 23 मध्ये स्फोट झाला.

तसेच प्रशिक्षणार्थी यांना अतिसंवेदनशिल ठिकाण असलेल्या या सेक्शन मध्ये कामा करिता पाठविले. त्यामुळे या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या नऊ कर्मचारी यांचे मृत्‍यूस तसेच इतर चार कर्मचारी यांचे गंभीर जखमी होण्यास आयुध निर्माणी जवाहरनगरचे सेफ्टी सेक्शनचे विभागीय अधिकारी देवेंद्र रामदास मिना (49), मेंन्टनन्स विभागाचे ज्युनीअर वर्क मॅनेजर आदिल रशील फारुकी (46 ), सामान्य प्रशासन विभागाचे संजय सुरेश धपाडे (44), सेक्शन प्रभारी अधिकारी आनंदराव मधुकरराव फाये (50) व आयुध निर्माणी जवाहरनगर व्यवस्थापनातील इतर जबाबदार अधिकारी हे कारणीभूत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या चार अधिकाऱ्यांसह इतरांवर फिर्यादी पोलीस स्टेशन जवाहरनगरचे पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील (42) यांचे लेखी रिपोर्ट वरुन अप.क्र. 78 / 2025 कलम 106 (1), 125 (ब) भा.न्या.स. 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी भंडारा करीत आहेत.

एलटीपीई सेक्शनच्या इमारत क्र. 23 मध्ये 24 जानेवारी 2025 रोजी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटात तिथे कर्तव्यावर हजर असलेल्या एकूण 13 कर्मचाऱ्यांपैकी मनोज आनंदराव मेश्राम (55 वर्ष, रा. बेला, ता.जि, भंडारा), अजयकुमार भजनदारा नागदेवे (51 वर्ष, रा. परसोडी, ता.जि. भंडारा), चंद्रशेखर वासुदेव गोस्वामी (49 वर्ष रा. आदर्श कॉलनी जवाहरनगर वसाहत, ता.जि. भंडारा), अभिषेक गोपाल चौरसीया (38 वर्ष, रा. छत्रपती शाहू नगर, भंडारा), लक्ष्मण भार्गव केळवदे (45 वर्ष, रा. आदर्श कॉलनी जवाहरनगर), धम्मानंद पद्माकर रंगारी (40 वर्ष, अंबिका नगर भोजापूर भंडारा), अंकित हुसन बारई (20 वर्ष, रा. साहूली, ता.जि. भंडारा), संजयकुमार रामचंद्र कारेमोरे (37 वर्ष, रा. खात, ता. मौदा, जि. नागपूर) यांचा मृत्‍यू झाला. तर जखमींपैकी जयदीप अजीत बॅनर्जी हे उपचाराकरिता केअर हॉस्‍पिटल, नागपूर येथे भरती होते. मात्र, उपचारा दरम्यान 28 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. तर या स्फोटात संजय जानबा राउत ( 55 वर्ष, रा. आंबेडकर वार्ड भंडारा), नरेंदकुमार प्रल्हाद पंजारी (55 वर्ष, जी. टाईप, 18/4 जवाहरनगर वसाहत, ता. जि. भंडारा), राजेश देवदास बडवाईक (33 वर्ष, रा. पालोरा, ता. मोहाडी, जि. भंडारा), सुनिलकुमार यादव ( 24 वर्षे, रा. जवाहरनगर), जयदीप अजितकुमार बॅनर्जी (48 वर्ष, जी. टाईम, 8/3, जवाहरनगर वसाहत, ता. जि. भंडारा) असे पाच कर्मचारी हे गंभीर जखमी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news