Bhandara News | येरली येथे विहिरीत पडले बिबट्याचे बछडे, वनविभागाकडून रेस्क्यु!

बछडे हरवल्याने मादी आक्रमक होण्याच्या शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Bhandara News | येरली येथे विहिरीत पडले बिबट्याचे बछडे, वनविभागाकडून रेस्क्यु!
Published on
Updated on

भंडारा : तुमसर तालुक्यातील येरली येथे आज, ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास स्थानिक शेतकरी दुर्गा पटले यांच्या शेतातील विहिरीमध्ये बिबट्याची दोन लहान पिल्ले (बछडे) पडल्याचे आढळून आले.

शेतात गेलेल्या शेतकºयाच्या निदर्शनास हा प्रकार आला. परिसरात मादी बिबट असण्याच्या भीतीने शेतकºयाने तातडीने आरडाओरड करून या घटनेची माहिती गावातील नागरिकांना व वनविभागाला दिली. विहिरीत बिबट्याची पिल्ले पडल्याची बातमी गावात वाºयासारखी पसरताच, घटनास्थळावर बछड्यांना पाहण्यासाठी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. घटनेचे गांभीर्य ओळखून माहिती मिळताच वन विभागाचे पथक रेस्क्यू साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बछडे अत्यंत लहान असल्याने आणि विहिरीत पाणी असल्याने त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हे वन कर्मचाºयांसमोर एक मोठे आव्हान होते. मात्र, वन विभागाने कोणतीही घाई न करता अत्यंत संवेदनशीलतेने त्या पिल्लांना वाचविण्याची मोहीम हाती घेतली.

वन विभागाच्या कर्मचाºयांनी विहिरीत विशेष जाळी टाकून अत्यंत काळजीपूर्वक दोन्ही पिल्लांना वर ओढले. विहिरीबाहेर काढल्यानंतर वन विभागाच्या वैद्यकीय पथकाद्वारे त्यांची प्राथमिक प्रकृती तपासण्यात आली. दोन्ही बछडे सुखरूप असून सध्या ते वन विभागाच्या सुरक्षित ताब्यात आहेत. हे बछडे खूपच लहान असल्याने त्यांना त्यांच्या आईची म्हणजेच मादी बिबट्याची अत्यंत गरज आहे.

त्यामुळे वन विभागाने आता या परिसरात मादी बिबट्याचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून, लवकरच या बछड्यांना त्यांच्या मादीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्यात येईल, अशी माहिती वन अधिकाºयांनी दिली. दोन्ही बछडे मादीपासून भरकटल्याने त्यांची आई आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनविभागाने नागरिकांना सतर्क राहाण्याचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news