Bhandara News : ‘लग्न काही मस्करी नाही...’ सुसाईड नोट लिहून नागपूरच्या विवाहितेने वैनगंगा नदीत उडी मारून जीवन संपविले

सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप
Bhandara News : ‘लग्न काही मस्करी नाही...’ सुसाईड नोट लिहून नागपूरच्या विवाहितेने वैनगंगा नदीत उडी मारून जीवन संपविले
Published on
Updated on

भंडारा : नागपूर येथील एका २८ वर्षीय विवाहितेने भंडारा येथील वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रिया निलेश पातोडे ( २८) रा. दिवान ले-आउट, बेसा रोड, नागपूर असे मृत तरुणीचे नाव आहे.

प्रिया पातोडे ही ११ जून २०२६ रोजी सकाळी ७:१५ वाजता कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. ती परत न आल्याने नागपूरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिच्या हरवल्याची तक्रार देण्यात आली होती. दरम्यान, शोध घेत असताना १५ जून रोजी सकाळी १०.१५ वाजता कारधा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सिरसघाट येथील वैनगंगा नदीपात्रात तिचा मृतदेह आढळून आला.

सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप

घटनेच्या ठिकाणी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यात मृत तरुणीने आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. तिने इंग्रजीत लिहिलं आहे की, ‘मम्मी-पप्पा सॉरी. मी वैनगंगा नदीत आत्महत्या करत आहे. कारण मी त्या घरी राहू शकत नाही. लग्न काही मस्करी नाही. सॉरी.’ तिने आपला सर्व सामान एका पर्समध्ये ठेवल्याचेही नमूद केले होते. मृत तरुणीचे वडील अशोक रामचंद्र फुंडे, रा. नागपूर यांनी दिलेल्या रिपोर्टवरून कारधा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news