Bhandara news | जप्तीच्या कारवाईसाठी गेलेल्या वकील आणि पोलिसांवर फेकली मिरची पूड

शहरातील संताजी नगरातील प्रकार, पोलिसांत गुन्हा दाखल
crime News
सांगलीत खंडणीसाठी व्यावसायिकावर खुनीहल्ला (Pudhari File Photo)
Published on
Updated on

भंडारा- न्यायालयाच्या आदेशाने घराचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या वकिलांसह पोलिस अधिकारी आणि बँक प्रतिनिधींवर एका महिलेने मिरची पूड फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहरातील संताजी नगरात घडली. याप्रकरणी भंडारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रुती लांजेवार यांनी संताजी नगर येथील आपला प्लॉट (क्र. ८३) इंडियन शेल्टर फायनान्स कॉर्पोरेट लिमिटेडकडे गहाण ठेवून १८ लाख ५३ हजार ६०० रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न केल्याने फायनान्स कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. मुख्य न्यायदंडाधिकारी, भंडारा यांच्या न्यायालयाने सदर मालमत्तेचा ताबा घेण्याचे आदेश दिले होते.

या प्रक्रियेसाठी वकील ओंकार गुलाबराव साठवणे यांची कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली. सोमवारी, ११ मे रोजी दुपारी १२:१५ वाजताच्या सुमारास कोर्ट कमिशनर ओंकार साठवणे, महिला पोलिस उपनिरीक्षक मिसाळ, पोलिस कर्मचारी आणि फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी ताबा घेण्यासाठी संताजी नगर येथे पोहोचले.

तिथे आरोपी महिला शक्ती प्रदीप कुरंजेकर (४०) हिने हे घर माझे आहे, असे सांगत दार उघडण्यास नकार दिला. कमिशनर यांनी न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली असता, आरोपी महिलेने शिवीगाळ करत खिडकीतून पोलिस आणि बँक प्रतिनिधींवर मिरची पूड फेकली. कमिशनर यांनी दार उघडला असता, आरोपी महिलेने त्यांना फसविण्याच्या उद्देशाने स्वत:चे कपडे काढले.

महिला पोलिसांनी तिला कापडांनी झाकण्याचा प्रयत्न केला असता, तिने महिला पोलिस अधिकाºयांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. या सर्व प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून, फिर्यादी ओंकार साठवणे यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी आरोपी शक्ती कुरंजेकर विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news