Bhandara News : ५९ कंत्राटी सफाई कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू

कंत्राटदार बदलले; मात्र काम सुरूच, कामगारांना कमी केल्याने संताप
Bhandara News : ५९ कंत्राटी सफाई कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू
Bhandara News : ५९ कंत्राटी सफाई कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू
Published on: 
Updated on: 

भंडारा : भंडारा नगर परिषदेत गेल्या १० ते १५ वर्षांपासून घनकचरा संकलन व स्वच्छतेचे काम करणाºया ५९ कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ महात्मा गांधी जयंतीपासून, अर्थात २ आॅक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. संबंधित कामगारांना तातडीने पूर्ववत कामावर घेऊन त्यांची सेवा अखंडित ठेवावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

विभागीय सहआयुक्त नागपूर यांनी २८ सप्टेंबर रोजी पत्राद्वारे ५९ कंत्राटी सफाई कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे निर्देश भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले होते. मात्र, या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. किमान वेतन, नियमित वेतन, साप्ताहिक सुटी, ओव्हरटाइम, सुरक्षा साधने तसेच सामाजिक सुरक्षेसह कामगार कायद्यानुसार मिळणाºया सुविधांसाठी २०२५ पासून नगर परिषद व संबंधित अधिकाºयांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

या मागण्यांबाबत सहाय्यक कामगार आयुक्त, भंडारा यांच्याकडेही निवेदने देण्यात आली असून प्रकरणाची सुनावणी सुरू असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. प्रलंबित मागण्यांकडे नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी एकदिवसीय लक्षवेधी कामबंद आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, आंदोलनानंतर कोणतीही पूर्वसूचना, कारणे दाखवा नोटीस, चौकशी किंवा सुनावणीची संधी न देता ५९ कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. १६ सप्टेंबर रोजी पूर्वीच्या कंत्राटदाराचे घनकचरा संकलनाचे कंत्राट रद्द करून त्याच दिवशी नवीन कंत्राटदाराला काम देण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.

कंत्राटदार बदलले असले तरी घनकचरा संकलन व स्वच्छतेचे काम त्याच नगर परिषद क्षेत्रात सुरूच आहे. त्यामुळे केवळ कंत्राटदार बदलल्याच्या कारणावरून अनेक वर्षांपासून काम करणाºया ५९ कामगारांना कामापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

नवीन कंत्राटदाराला पूर्वीपासून कार्यरत असलेल्या कामगारांना कामावर घेण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत, तसेच त्यांच्या सेवा अखंडित ठेवाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news