Navegaon Tiger Reserve | नवेगाव-नागझिऱ्यात ‘युनिफाईड कंट्रोल’ची अंमलबजावणी सुरू: १२ वनपरिक्षेत्र कार्यालयांचे उद्घाटन

प्रशासकीय सुसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकसंघ नियंत्रणप्रणालीचा (युनिफाईड कंट्रोल) निर्णय
Navegaon Nagzira Tiger Reserve
Navegaon Nagzira Tiger ReservePudhari
Published on
Updated on

Navegaon Nagzira Tiger Reserve Unified Control System

भंडारा: नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात प्रशासकीय सुसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकसंघ नियंत्रणप्रणालीचा (युनिफाईड कंट्रोल) निर्णय मागीलवर्षी घेतला होता. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी १ एप्रिलपासून सुरू झाली असून, याअंतर्गत येणाऱ्या १२ वनपरिक्षेत्र कार्यालयांचे उद्घाटन क्षेत्र संचालक पियुषा जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

नवेगाव-नागझिरा हा राज्यातील सहा प्रमुख व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असून, याचा विस्तार भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आहे. सन २०१७ मध्ये या प्रकल्पाचे बफर क्षेत्र जाहीर झाले होते. मात्र, आजवर या क्षेत्राचे व्यवस्थापन प्रादेशिक वनविभाग गोंदिया ४१९.८९४ चौ.किमी, भंडारा ६८.५६६ चौ.किमी आणि एफडीसीएम १३९.५१४ चौ.किमी अशा वेगवेगळ्या विभागांकडे होते.

Navegaon Nagzira Tiger Reserve
Navegaon Nagzira Tiger Reserve | नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ५०० चितळ आणणार; नवीन चार प्रवेशद्वारांचा समावेश

या विखुरलेल्या व्यवस्थापनामुळे अनेक प्रशासकीय अडचणी येत होत्या. आता नव्या शासन निर्णयानुसार सर्व बफर क्षेत्राचे नियंत्रण व्याघ्र प्रकल्पाकडे आले आहे. प्रकल्पाच्या या नवीन नियमांमुळे संवर्धन कार्याला नवी गती मिळेल, असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे.
युनिफाईड कंट्रोलमुळे वन्यप्राण्यांचा शिरकाव आणि मानवी वस्तीतील संघर्ष कमी करण्यास मदत होईल. बफर क्षेत्रातील स्थानिक नागरिकांसाठी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.  नागरिकांच्या प्रलंबित समस्यांचे तातडीने निराकरण करणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बदललेले स्वरूप आणि उद्दिष्टे


वनसंरक्षक (प्रादेशिक), नागपूर यांच्या २७ मार्च २०२६ च्या आदेशानुसार, विविध वनपरिक्षेत्रांच्या कार्यक्षेत्रात आणि मुख्यालयात बदल करण्यात आले आहेत. नवीन रचनेनुसार उमरझरी, तिरोडा, सडक/अर्जुनी, नागझिरा, देवरी, पिटेझरी, कोका, गडेगाव, नवेगाव पार्क, डोंगरगाव, झांशीनगर आणि बोंडे या वनपरिक्षेत्र कार्यालयांचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे. या कार्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रसंचालक पियुषा जगताप, उपसंचालक प्रितमसिंग कोडापे, उपवनसंरक्षक पवन जोंग, विभागीय वनाधिकारी अतुल देवकर, तुषार ढमढेरे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news