Navegaon Nagzira Tiger Reserve | नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रातील जंगल सफारी बंद

बफर क्षेत्रातील पर्यटन गेट व पर्यटन संकुले नियमितपणे सुरू राहणार
NNTR Core Zone Safari Closed
NNTR Core Zone Safari ClosedAI Photo
Published on
Updated on

NNTR Core Zone Safari Closed

भंडारा : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील जंगल सफारी व पर्यटन संकुल 1 जुलै 2026 पासून पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पर्यटन गेट व पर्यटन संकुले नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक पियुषा जगताप यांनी दिली.

यापूर्वी वनविभागाने कोअर क्षेत्रातील पर्यटन गेट व पर्यटन संकुल 15 जून ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 16 जून 2026 पासून ऑफलाइन तसेच संकेतस्थळावरील ऑनलाइन आरक्षण सुविधा बंद करण्याचे आदेशही जारी करण्यात आले होते. मात्र, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी सुधारित आदेश जारी करून 15 जूनऐवजी 30 जून 2026 पर्यंत पर्यटन सुरू ठेवण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार कोअर क्षेत्रातील पर्यटन 30 जून 2026 पर्यंत सुरू ठेवण्यात आले.

NNTR Core Zone Safari Closed
Navegaon Nagzira Tiger Reserve | नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ५०० चितळ आणणार; नवीन चार प्रवेशद्वारांचा समावेश

दरवर्षीप्रमाणे संरक्षित क्षेत्रातील पावसाळी हंगामात निसर्ग पर्यटनासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार कोअर क्षेत्रातील जंगल सफारी व पर्यटन संकुल 1 जुलै 2026 पासून पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. तथापि, बफर क्षेत्रातील पर्यटन गेट व पर्यटन संकुल सुरू राहणार असून पर्यटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक पियुषा जगताप यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news