Bhandara News | चोरट्यांनी मारला खासदारांच्याच शेतातील मोटरपंपावर डल्ला!

भंडाऱ्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून विज मोटरसह, मीटरही लंपास
Bhandara News
Bhandara News File Photo
Published on
Updated on

भंडारा: जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरला असून, आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत. भंडाऱ्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून चोरट्यांनी वीज मीटरसह मोटरपंप लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भंडारा शहराजवळील बायपास मार्गावर डॉ. प्रशांत पडोळे यांचे वडिलोपार्जित शेत आहे. या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी मोटरपंप बसवण्यात आला होता. मात्र, शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता, तेथील मोटरपंप आणि वीज मीटर चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आता थेट खासदारांच्याच शेतात चोरी झाल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे स्वत: खासदारांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news