

भंडारा : पालांदुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात असून ती गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी २२ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी पीडित मुलगी नेहार शरद चारमोडे (२२) या युवकाच्या घरी इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम विचारण्यासाठी गेली होती. त्यावेळी घरात कोणी नसताना आरोपीने संधी साधून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केला होता. दोन महिन्यांनंतर पीडितेला मासिक पाळी न आल्याने व पोटात दुखत असल्याने कुटुंबियांनी तिला उपचारासाठी, पोहरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पीडिता दोन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती तिच्या वडिलांना दिली. याबाबत पीडितेने लाखनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून युवकाला अटक करण्यात आली आहे.
पीडिता आणि आरोपी एकाच गावातील आहेत. ही घटना २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान घडली. इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम समजावून घेण्यासाठी पीडित मुलगी आरोपीच्या घरी गेली असता घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. वडिलांच्या भीतीने तिने ही घटना घरात सांगितली नव्हती.