Bhandara Accident | भंडारा-लाखनी मार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक, तरूण ठार

सात वर्षांचा बालक किरकोळ जखमी
 Accident News
Accident NewsPudhari
Published on
Updated on

Lakhni Road Speeding Car Hits Bike
भंडारा:
कार अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर सात वर्षांचा बालक किरकोळ जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि.३) दुपारी २:३० वाजता भंडारा-लाखनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील गडेगाव येथे घडली.

मृत तरुणाचे नाव संतोष सुधाकर बांते (३०), रा. मोहदुरा ता.भंडारा असे असून जखमी मुलाचे नाव आयुष नरेंद्र कमाने (७), रा. गडेगाव आहे.

 Accident News
Bhandara News : महिला रुग्णालयातील २८ कोटींच्या साहित्य खरेदीची चौकशी थंडबस्त्यात; राजकीय दबावाखाली प्रकरण दडपल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बांते आणि आयुष कमाने हे दुचाकीवरून जात असताना भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.  या अपघातात संतोष गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर आयुष किरकोळ जखमी झाला. लाखनी  पोलिसांनी कार चालका खेमचंद दुवेदास कावळे (२७) रा. भंडारा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कपूर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news