Bhandara Koka Sanctuary | कोका अभयारण्यात वन्यप्राण्यांच्या झुंजीत अस्वलाचा मृत्यू

मंडनगाव परिसरात गस्त करीत असताना त्यांना वन्यप्राण्यांचे ओरडण्याचे आवाज
Bear Died Bhandara
Bear Died BhandaraAI photo
Published on
Updated on

Bear Died Bhandara
भंडारा:
वन्यप्राण्यांच्या झुंजीमध्ये एका अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना कोका अभयारण्यातील मंडनगाव बफर परिसरात आज उघडकीस आली. वनरक्षक ए.सी हटकर वनरक्षक आणि मजूर अभयारण्यातील मंडनगाव परिसरात गस्त करीत असताना त्यांना वन्यप्राण्यांचे ओरडण्याचे आवाज ऐकले.

तिथे गेले असता नाल्यात अस्वल हातपाय हलवत विव्हळत होते. काही क्षणातच त्याची हालचाल बंद झाली. याबाबतची माहिती मिळताच क्षेत्र संचालक पियुषा जगताप, उपसंचालक प्रितमसिंग कोडापे यांच्या मार्गदर्शनात कोका वनक्षेत्राचे सहाय्यक वनसंरक्षक सुहास कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरजकुमार गोखले यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपास केला असता अस्वलाच्या शरिरावर खोल जखमा होत्या. तसेच पायवाटेवर रक्त सांडलेले दिसले. झुंजीचे निशाणदेखील दिसून आले.

Bear Died Bhandara
Bhandara Accident | धारगाव येथे ‘हिट अँड रन’चा थरार: अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वृद्ध ठार

अस्वलाचा मृत्यू वन्यप्राण्यांचे झुंजीत झाले असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. एनटीसीएच्या प्रमाणभूत कार्यपध्दतीनुसार दुसºया प्राण्याचा शोध घेतला जात आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सुरजकुमार गोखले, क्षेत्र सहायक नरडंगे, मेश्राम व हटकर करीत असून मृत अस्वलाचे नमुने उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news