

Bhandara Gambling Raid
भंडारा : आंधळगाव पोलिस स्टेशन अंतर्गत टांगा येथील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकली. यात १६ जुगाऱ्यांसह २१ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १४ जून रोजी संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
आंधळगावचे पोलिस निरीक्षक नितीन राठोड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन त्यांनी आपल्या पथकासह टांगा शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर धाड टाकली. यावेळी आरोपी अक्षय अनिल पाटील रा. राजेंद्र वॉर्ड, आंधळगाव, आकाश रमेश महालगावे रा. अभ्यंकर नगर, तुमसर, कैलास नरेंद्र बनसोड रा.शास्त्री वार्ड, वरठी, सुरज राजेश माने रा. नविन टाकळी, भंडारा, गंगाधर सहदेव चवळे रा. काचुरवाडी, ता. रामटेक जि. नागपुर, अनिल बाबुलाल दमाहे रा.आंबेडकर वार्ड, देव्हाडी, मयुर महेंद्र खोब्रागडे रा. शास्त्री वार्ड, वरठी, राजकुमार टेकचंद कुनभरे रा. माकडे वार्ड तुमसर, अमीत अजाबराव खोब्रागडे रा.शास्त्री वार्ड वरठी, अविनाश भोजराम वैरागडे रा. दाभा, ता.जि. भंडारा, सुरेश भाऊराव सार्वे रा. गुंजेपार ता.जि भंडारा, जितेंद्र चौधरी, रा. भगतसिंग वॉर्ड, टाकळी ता.जि. भंडारा, राहुल सुखराम गायधने रा. भगतसिंह वॉर्ड भंडारा, राहुल मधुकर पडघने रा. पुसद जि. यवतमाळ, सुधाकर मार्कंडराव निनावे रा. आंधळगाव यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल असा एकूण २१ लाख ४८ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आंधळगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात आंधळगावचे ठाणेदार नितीन राठोड व त्यांच्या पथकाने केली.