Bhandara Lightning Strike Death | भाताची रोपे लावत असताना वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

मोहाडी तालुक्यातील बेटाळा गावातील घटना
Youth dies after being struck by lightning
वीज पडून मृत्यूPudhari News Network
Published on
Updated on

Bhandara Mohadi Taluka Farmer Dies Lightning

भंडारा :
जिल्ह्यात सोमवारी दुपारी झालेल्या पावसामुळे मोहाडी तालुक्यातील बेटाळा गावातील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मेघगर्जनेसह पाऊस पडत असताना शेतात काम करत असलेल्या या शेतकऱ्यावर वीज कोसळली. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. रामकृष्ण तुकडू देशमुख (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सोमवारी दुपारी हवामानात अचानक बदल झाला आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मोबाईलवर वीज पडण्याबाबतचा इशारा (अलर्ट) देण्यात आला आणि मेघगर्जना सुरू झाली. खरीप हंगाम सुरू असल्याने जिल्ह्यातील शेतकरी आपापल्या शेतात काम करत होते. रामकृष्ण तुकडू देशमुख हे देखील आपल्या शेतात भाताची रोपे लावत असताना अचानक त्यांच्यावर वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाला.

Youth dies after being struck by lightning
Bhandara Tiger Captured | तीन महिन्यांची दहशत संपली; अखेर नरभक्षी टी-२७ वाघीण जेरबंद

स्थानिक नागरिकांनी तालुका  प्रशासनाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पटवारी आणि तहसीलदार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या या शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.

सहा शेतकऱ्यांचा बळी
या वर्षी आतापर्यंत (सोमवारपर्यंत) जिल्ह्यात वीज पडून एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हवामानात बदल होताच प्रशासनाकडून मोबाईलवर सूचना (अलर्ट) पाठवल्या जात असल्या, तरी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांकडे अनेकदा मोबाईल नसतात; त्यामुळे त्यांना आवश्यक ती खबरदारी घेता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news