Bhandara Crime
Bhandara Crime | लग्न तोडल्याच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्लाFile Photo

Bhandara Crime | लग्न तोडल्याच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला

तावशी गावातील घटना, दिघोरी पोलिसांत गुन्हा दाखल
Published on

भंडारा :  दिघोरी पोलिस ठाणे हद्दीतील तावशी गावात लग्नाचा प्रस्ताव तोडल्याच्या रागातून एका तरुणासह त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दिघोरी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तावशी येथील विक्की रायभान बडोले या युवकाचे लग्न एका युवतीसोबत ठरले होते. मात्र संबंधित युवतीचे अन्य एका युवकासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर विक्कीने या लग्नास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या युवतीचा भावजी धम्मरत्न सुधीर टेंभुर्णे याने आपल्या नातेवाईक व सहकाऱ्यांच्या चारचाकी वाहनाने विक्कीच्या घरासमोर धडक दिली. आरोपींनी घरासमोर येताच विक्की व त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही क्षणातच वाद वाढून आरोपींनी विक्की व त्याच्या भावावर लाठ्या व हातांनी बेदम मारहाण केली.

या हल्ल्यात विक्कीच्या उजव्या पायाच्या पंजाला, कोपºयाला तसेच छातीवर गंभीर दुखापत झाली आहे. तर त्याच्या भावाच्या गळ्याला व हाताला गंभीर मार लागला आहे. मारहाणीनंतर आरोपींनी पुन्हा जीवाने मारण्याची धमकी दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पीडित युवकाने दिघोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news