

भंडारा: उकळत्या पाण्याच्या बादलीत पडून एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तुमसर तालुक्यातील डोंगरी बुज. येथे घडली. रिधाणा प्रमोद शेंद्रे (४) रा. डोंगरी बुज. असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
सकाळच्या सुमारास रिधाणा हा आपल्या घरी खेळत होता. खेळता खेळता तो स्वयंपाक खोलीमध्ये ठेवलेल्या उकळत्या पाण्याच्या बादलीत पडला. त्यात त्याचे शरीर गळ्यापासून पायापर्यंत गंभीररित्या भाजले गेले. त्याला आधी तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयातून भंडारा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोबरवाही पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.